Posts

Day 4

  तारीख :- २०/०९/२०२२                            दिवस :- ४  आज सकाळी ४ला उठलो होतो .रोनक खूप रडत होता . E-commerce वेबसाईट कशी बनवायची यासाठी एक चॅनेल सापडल आहे . आता माघार नाही कसही करून एक चांगली वेबसाइट बनवायचीच . राकेश आज बंगळुरू ला जाण्यासाठी निघाला आहे . 

Day 3

दिनांक :- १९ /०९/२०२२                              दिवस :-3               काळाचा दिवस खूप छान गेला . मी काल जवळपास दिवसभर अभ्यासिकेत होतो . Mechawash च्या वेबसाईटव च काम जवळपास बरेच पुणे सरकल पण मी फुल फोकस ने बसत नव्हतो . 2 वेला फिरायला ही गेलो होतो . रात्री आम्ही सर्वे दाजी , ताई , रोनक , अतुल (दाजींचा मित्र ) सर्व पार्टी ला गेलो होतो. काल दाजींचे दाजी पण आले होते . आजचा दिवस कलपेक्षा जास्त मेहेनत करायची आहे . मी आता दूध पिऊन चाललो आहे . आज दुपारी मी 2 तास झोपलो होतो झोपून परत 4 वाजता अभ्यासाला आलो . मी वेबसाईट आरधी बनवली पण पुढे काय करायचं काहीच सुचत नाहीये . मी आता  श्री मोरया गोसावीला जाऊन येतो . तेथून योगा च पुस्तक पण विकत घ्यायच आहे . आज मी पुस्तक विकत घेतल आहे . त्याच्यात दिलेला योग course पण मी करेल . आता १० वाजता मी झोपत आहे उद्यापासून जास्त मेहेनत करायची . शुभ रात्री ..

Day 2

तारीख :- १८/०९/२०२२                  दिवस :- 2               आज मी सकाळी 3:50 ला उठलो आणि योगा करून सर्व तयारी करून कामासाठी बसलो आहे . मी आज 8 वाजता अभ्यासिकेत आलो आणि 12 वाजता जेवाययला गेलो . मी जेवणाआधी रितेश अगरवाल याचा interview पहिला आणि खूप मस्त वाटलं . 

Day 1

                               श्री गणेशाय नमः तारीख :- १७/०९/२०२२                         दिवस :- १ मी आजपासून पुढील 365 दिवस एक वेगळाच प्रवास सुरु करतोय . मला आता स्वतः मध्ये परिवर्तन करण्याची खूप इच्छा आहे . हे  356 दिवसाचा रोजचा प्रवास म्हणजे रोजनिशी मनातील सर्व गोष्टी मी या याच्यात लिहीत जाईल . कारण हे याच्यात असच कायम राहील .माझी पूर्ण इच्छा आहे की हा परिवर्तनाचा प्रवास असाच जमा राहावा . मला माहिती आहे एकाद्या मनुष्याला जर बदलायचं असेल तर काय करायला पाहिजे . मेहेनातीची मदत घेतली पाहिजे . कठीण मेहेनत केल्याने सर्व गोष्टी साध्य होतात . हे पूर्ण ३६५ दिवस (1) मी ब्रह्मचर्य पाळणार आहे . (२) मी प्रचंड मेहेनत करणार आहे . (३) मी माझा स्वतःचा उद्योग उभा करून त्याच्या साठी मेहेनत     करणार आहे . (४) मी ह्या दिवसात ११ तरी योगासने सिध्द करणार आहे .    ...