Day 1

 

                             श्री गणेशाय नमः


तारीख :- १७/०९/२०२२                        दिवस :- १
मी आजपासून पुढील 365 दिवस एक वेगळाच प्रवास सुरु करतोय . मला आता स्वतः मध्ये परिवर्तन करण्याची खूप इच्छा आहे . हे  356 दिवसाचा रोजचा प्रवास म्हणजे रोजनिशी मनातील सर्व गोष्टी मी या याच्यात लिहीत जाईल .
कारण हे याच्यात असच कायम राहील .माझी पूर्ण इच्छा आहे की हा परिवर्तनाचा प्रवास असाच जमा राहावा . मला माहिती आहे एकाद्या मनुष्याला जर बदलायचं असेल तर काय करायला पाहिजे . मेहेनातीची मदत घेतली पाहिजे . कठीण मेहेनत केल्याने सर्व गोष्टी साध्य होतात . हे पूर्ण ३६५ दिवस (1) मी ब्रह्मचर्य पाळणार आहे .
(२) मी प्रचंड मेहेनत करणार आहे .
(३) मी माझा स्वतःचा उद्योग उभा करून त्याच्या साठी मेहेनत     करणार आहे .
(४) मी ह्या दिवसात ११ तरी योगासने सिध्द करणार आहे .
         मी आता श्री मोरया गोसावी यांच्या मंदिरात बसलो आहे .त्यांनी आपल्या ४२ दिवसांच्या एकाग्रतेने केलेल्या तपस्येने देवाला प्रकट केले होते . त्यामुळेच जर ३६५ दिवस जर आपण मेहेनत केली तर काय होऊ शकत ते पुढे दिसेलच . मी पुढे हा प्रवास लिहीत दिसेल . मी आताच डिजिटल वेलनेस म्हणून गुगळे मोबाइल अप्लिकेशन आहे त्यावर Youtube वर ३० मिनिट , Google  Chrome वर १५ मिनिट , Whats up वर १५ मिनिट असा प्रतिबंदध लावला आहे त्यामुळे माझ्या मोबाइलला वापरण्यावर बंदी येईल . मोबाइलला फक्त चांगल्याच गोष्टीसाठी वापरता येईल .
कारण मला मोबाईलच खूप व्यसन झालं आहे . माझा काळाचा मोबाईल वापरण्याचा वेळ 9 तास ५६ मिनिटे व परवाच्या मोबाइलला वापरण्याचा वेळ 10 तास 28 मिनिटे आहे . मला Youtube चे जास्त व्यसन आहे . असो आजपासून कोणत्याच कारणास्तव मी ठरवलेल्या वेळेच्या वर वेळ मी वाढवणार नाही . आज पहिला दिवस मी एकदम थकलेला असा feel करत आहे . परंतु मेहेनतीने व ब्रह्मचऱ्याने मी पुन्हा पूर्ण ऊर्जावाण होऊन जाईल . मी google calender वर प्रत्येक दिवसाच नियोजन करेल. आज खूप थकलेल्या सारख वाटत आहे काहीच कारवस वाटत नाही . खूप कमी ऊर्जा आहे शरीरात.मी आज दुपारी १ पासून तर ४:२० पर्यंत झोपून राहिलो .Mechawash च टेन्शन आलं आहे मला कारण वेबसाईट पण पूर्ण झालेली नाही .Mechawash साठी पैसे पण जमवलेले नाहीत . या सर्वांच कारण मी मेहेनत करत नाही आहे .एखादी कंपनी फक्त चांगली कल्पना असल्यामुळे उभी होत नसते . Elon musk म्हणतो एका आठवड्यात 100 तास काम करा .आणि मी फक्त 20 ते 21 तास करत असेल . हा 80 तासांचा गॅप मला भरावा लागेल . मी आता ठरवलं आहे की मी उद्यापासून रोज 15 तास काम करेल आणि रोज 3:50 a.m ला उठेल . त्यामुळे मी स्वतःलाच पार्टी देत आहे . पिझ्झा पार्टी .......मी आज  १० वाजताच झोपत आहे कारण उद्या लवकर उठायचं आहे .


Comments